सत्पात्री दान म्हणजे काय ?

खरेतर कोणतेही दान सत्पात्रीच असले पाहिजे. तरच ते कारणी लागते आणि त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने आशिर्वाद आणि दुवा प्राप्त होतात. ज्यांची पोटे तुडुंब भरली आहेत, ज्यांचेकडे भरपूर संपत्ती आणि साधने आहेत, त्यांना अन्नदान किंवा कोणत्याही प्रकारचे दान करून काडीचाही उपयोग होत नाही. विविध समारंभ, लग्न किंवा इतर प्रसंगी, सणासुदीला आपण भेटी देतो, दान करतो किंवा आहेर करतो ते देत असताना प्रत्येकाने “ आपण ज्याला हे देत आहोत, त्याला याची खरोखरच किती गरज आहे ? ” असा विचार केला पाहिजे. जर त्याला गरज नसेल तर, ज्याला खरोखरच गरज आहे त्याला आपण भेट दिली, वस्तू दिल्या, अन्नदान केले तर त्याला त्याचा उपयोग होईल आणि तो अंत:करणपूर्वक आपल्याला दुवा देईल. ज्याला गरज नाही त्याचेकडे वस्तूंची आणि सामानांची अनावश्यक गर्दी होणार नाही. “ भुकेल्या पोटाला प्रथम अन्न द्या ” असे स्वामी विवेकानंदानीही आग्रहाने सांगितले आहे. 

 

अनेकदा कितीतरी व्यक्ती पुण्य कमवायच्या कल्पनेने काही विशिष्ठ व्यक्तींना / संस्थांना अन्नदान करतात. पंचपक्वांनांचे जेवण घालतात. मात्र त्याचा उपयोग होत नाही. मग नैराश्य येते.  भिका-यांना अन्न किंवा इतर कोणतेही दान दिल्यास ते अनेकदा वाया जाते. कारण त्यांचेकडे तो आपुलकीचा, आत्मियतेचा भाव नसतो. कृतज्ञतेची जाणीव नसते. त्यामुळे अन्नदान हे सत्पात्री हवे.

सत्पात्री दानाबद्दल माहिती तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर शेअर करा.

Draupadi Thali.jpg

अन्नदान कशाप्रकारे करावे  ?

प्रत्येक व्यक्तीच्या अंत:र्मनामध्ये सतत दोन प्रवाह सुरू असतात. एक शुभ वासनांचा / शुभ इच्छांचा प्रवाह सुरू असतो आणि एक अशुभ वासनांचा / अशुभ इच्छांचा प्रवाह सुरू असतो. प्रत्येकाला शुभ, चांगल्या, सर्वांच्या हिताच्या गोष्टी करायची मनापासून इच्छा असते. मात्र मनातीलच दुसरा प्रवाह त्याला मागे खेचत असतो. अजून एक गंमत म्हणजे शुभ म्हणजे काय ? चांगले, हिताचे काय आहे हे प्रत्येकाला कळत असते. तशी जन्मापासून उपजत व्यवस्था प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणामध्ये भगवंताने करून ठेवलेली आहे. पण तरीही सत्कर्म करताना माणसे नेहमी चालढकल करीत राहतात हे आपण सर्वत्र पाहतो आणि अनुभवतो आहोत. म्हणून शहाण्या माणसाने “ अच्छा करो और कुएमें डालो ” अशी भुमिका सातत्याने बाळगली पाहिजे. सत्कर्म करण्याची, समाजासाठी, इतरांसाठी काही देण्याची आणि चांगली इच्छा मनात आली कि ती लगेच पूर्ण करून टाकली पाहिजे. अर्थात यामध्येही तारतम्य बाळगले पाहिजे. कर्ज काढून आणि घरदारे विकून दानशूरपणाची हौस कधीही करता कामा नये.

 

अन्नदान करताना अनेकदा खालील गोष्टी घडतात.   

         

(१) देशामध्ये अनेक बंधूभगिनींना मनापासून अन्नदान करायची इच्छा असते. पण ते त्यांच्या जीवनात इतके व्यस्त असतात कि त्यांना त्यासाठी वेळ मिळत नाही. शिवाय धान्य किंवा अन्न घेवून ते देण्यासाठी घेणाऱ्याला कोठे शोधत जायचे, असे त्यांना वाटते.

(२) अन्नदान करायची इच्छा असते. पण त्यांना संकोच वाटतो. घेणाऱ्याने आपण दिलेले दान न घेता आपला अपमान केला तर काय करायचे, अशी सुप्त भीती अनेकांना असते.

(३)  अन्नदान करायचे असते, पण त्यात परिस्थितीमुळे किंवा स्वभावामुळे चालढकल होत राहते आणि ते पुढे पुढे ढकलले जाते.

(४)  अन्नदानाचे महत्त्व आणि ते का करावे हेच माहित नसते. मात्र एकदा समजून घेतल्यावर ते करायची त्यांची तयारी असते.

(५) अन्नदान करायची इच्छा असते. परंतु घरातील इतर मंडळींचा विरोध असतो. त्यामुळे इच्छा असूनही अन्नदान करता येत नाही, अशा एक ना अनेक अडचणी असतात.

 

या सगळ्याचा विचार करून कर्दळीवन सेवा संघातर्फे “ द्रौपदीची थाळी - सत्पात्री अन्नदान ”  सेवा सुरू करण्यात आली आहे.

 

“ द्रौपदीची थाळी - सत्पात्री अन्नदान ” सेवेमध्ये प्रत्येक व्यक्ती, बंधू –भगिनी, संस्था, कंपनी इ. खालिल प्रकारे सहभागी व्हावे ही विनंती.

 

(१)  स्वत: अन्नदानासाठी रक्कम देवून : यामध्ये एकावेळी किमान रू. १००१/- आणि त्यापेक्षा जास्त रक्कम  

(२)  दरमहा किमान रू. १०००/- किंवा वर्षाचे एक रकमी रू. १२,०००/-

(३)  दरमहा रू. २०००/- रू. ३०००/- रू. ५०००/- किंवा रू. १०,०००/-

(४)  एक रकमी रू. १० हजार, रू. ५० हजार किंवा रू. १ लाख रुपये

(५)  कुटूंबातील सदस्याच्या वाढदिवशी, स्मृतीदिनी रू. १०००/-, रू. २०००/-, रू. ५०००/-, रू. १०,०००/-

(६)  कुटुंबातील विशेष प्रसंगी ( उदा. लग्न, मुंज, साठी, निवृत्ती, पुरस्कार प्राप्त झाल्यावर इ.) रू. ५०००/-, रू. १०,०००/-, रू. २१,०००/-, रू. ५०,०००/-, रू.. १ लाख एवढी रक्कम देऊन

(७)  आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, सहकारी, व्यावसायिक सहयोगी इ. सर्वांना सत्पात्री अन्नदानाविषयी आणि द्रौपदीची थाळी या योजनेसंबंधी माहिती देऊन आणि त्यांना उद्युक्त करुन.

(८)  “ द्रौपदीची थाळी - सत्पात्री अन्नदान ” सेवेची माहिती व्हॉटस अप, फेसबुक, युट्युब, ईमेल, सोशल मीडियाद्वारा तसेच  बोलता बोलता, संभाषणातून इतरांना सांगून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे.

(९)  या योजनेबाबत स्वत:हून पुढाकार घेवून त्याची माहिती विविध कार्यक्रमातून सांगणे, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे वर्तमानपत्रे, मासिके यांमध्ये लिहणे, याबाबात जागृती निर्माण करणे, इ.

(१०)  लोकांचे अनुभव एकत्र करणे, ते एकमेकांना सांगणे, त्यासंदर्भात विचारांचे आदान प्रदान करणे इ.

(११)  अतिथी सेवा, अतिथी धर्म आणि सत्पात्री अन्नदान या विषयी जागृती निर्माण करणे, त्याची पुन:र्स्थापना करणे.

(१२) वैयक्तिक सामाजिक जबाबदारी अर्थात पी. एस. आर. - पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार करणे..

Tags: Donate Food Online, Food Donation, Corporate Social Responsibility

  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon
  • Twitter Social Icon