पीएसआर - पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात वैयक्तिक सामाजिक जबाबदारी

नि:स्वार्थ हा सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. मात्र त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी म्हणजे उद्योजक आणि व्यावसायिक यांनी सक्तीने, कायदा पाळायचा म्हणून समाज सेवा करावी अशी कल्पना आहे. त्याचबरोबर सरकारने समाजासाठी आणि जनतेसाठी सर्वकाही करावे, यासंदर्भात लोक चर्चा करीत राहतात. पण स्वत: व्यक्तीश: काय करावे यासंदर्भात प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि कृती होत नाही.

 

वैयक्तिक सामाजिक जबाबदारीची भावना भारतीय माणसाच्या संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे रुजलेली आहे. सर्वसामान्य भारतीय व्यक्ती अगदी प्रवास करताना सुद्धा आपला खाऊ सहप्रवाश्यांबरोबर वाटून खातात. अतिथी देवो भव अशी भारताची गेल्या हजारो वर्षांची संस्कृतीच सहजीवनाची आणि सामाजिक बांधिलकीची आहे. मात्र आज परिस्थिती काहीशी बदललेली आहे असे आपण अनुभवतो आहोत. एक दाणा दिल्यावर भगवंत हजारो दाण्यांनी त्याची भरपाई करतो.  तरीही आजकाल अधिकाधिक संपत्ती आपल्या साठी आणि पुढील पिढ्यांसाठी साठवून ठेवायची स्पर्धा सुरू आहे. बरे जाताना यातील एकही वस्तू बरोबर घेवून जाता येत नाही. ज्यांच्यासाठी ती संपत्ती गोळा केली त्यांना त्याची काडीइतकी किंमत नसते. फुकट मिळालेली संपत्ती उधळून टाकायलाच ते बसलेले असतात. ही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे समजावून घेवून प्रत्येकाने किमान दरमहा काही रक्कम अन्नदानासाठी द्यावी आणि आपल्या जीवनात विलक्षण अनुभव घ्यावेत. आपली सर्वार्थाने वैयक्तीक प्रगती होत असताना देशातील आपल्याच बंधू भगिनींना किमान रोज दोन घास पोटभर खायला मिळावे, यासाठी आपण स्वत:हून पुढे यावे आणि या द्रौपदीच्या अक्षय्य थाळीत मनापासून सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन आहे.

Tags: Corporate Social Responsibility, Personal Social Responsibility, Donate Food Online, Food Donation

पी.एस.आर. बद्दल तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर शेअर करा.

  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon
  • Twitter Social Icon

Call us:

7720927802

Find us: 

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Deccan Gym, Pune -04

Draupadi Thali

Kardaliwan Seva Sangh Trust