top of page

अन्नदान – महत्व आणि महात्म्य

कलियुगात अन्नदानाचे फार मोठे महत्व आणि महात्म्य आहे. अन्नदान हे सत्पात्री असले पाहिजे. ज्याला खरोखरच आवश्यक आहे त्याला अन्न दिल्याने त्याचा जो आशिर्वाद मिळतो तो आपल्या जीवनात चमत्कार निर्माण करतो. Goodwill always work… सदिच्छा, मनापासून दिलेले आशिर्वाद, पोट भरल्यावर तृप्तीने दिलेला आशिर्वाद आणि दुवा हा अमूल्य असतो. प्रत्येकाचे पोट म्हणजे जणू यज्ञकुंडच असते. ज्या अग्नीमध्ये अन्नाचा घास पडल्यावर जो आशिर्वाद मिळतो तो म्हणजे जणू त्या यज्ञाचे फळच असते. “ जे जे भेटीजे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥” असे संत तुकारामांनी म्हटले आहे. तसेच “ शिवभावे जीवसेवा” असे स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंसांनी म्हटले आहे. प्रत्येक जीव, मनुष्य, प्राणी यांच्या पोटातील जठरामध्ये जो अग्नी रोज प्रज्वलीत होतो त्यात अन्नाची आहुती पडली म्हणजे त्यादिवशीचा यज्ञ पूर्ण होतो. ज्या अग्नीने रोज कोट्यावधी बांधव भुकेने तळमळत, उपाशी पोटी झोपतात म्हणजे त्यांच्या पोटातील यज्ञाला आहुती मिळत नाही, तो तसाच विझतो. आज भारतात ५०% हून अधिक बांधव दारिद्र्य रेषेखाली आहेत. ते एकतर उपाशी राहतात किंवा त्यांना एकवेळच जेवायला मिळते. देशातील प्रत्येक व्यक्तीला, आपल्या प्रत्येक बंधू भगिनीला रोज पोटभर जेवायला मिळायला पाहिजे, त्यांच्या पोटातील यज्ञ रोज पूर्ण झाला पाहिजे.

अन्नदानाचे महत्त्व तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर शेअर करा.

कलियुगाची अद्‍भुत उपलब्धी - प्रत्येक युगाचे एक पुण्यदायी कर्म आहे. जसे सत्ययुगाचे पुण्यदायी कर्म तप हे होते, त्रेतायुगाचे पुण्यदायी कर्म साधना हे होते, द्वापार युगाचे पुण्यदायी कर्म यज्ञ हे होते, तसे कली युगाचे पुण्यदायी कर्म दान हे आहे. त्यातही भुकेल्याला अन्नदान हेच मुख्य पुण्यदायी कर्म आहे. कलियुगाचे एक अनोखे वैशिष्ट्ये आहे, ते म्हणजे कलियुगात सत्कर्माचे फळ त्वरीत मिळते. सत्य युगामध्ये ९०% सत्य आणि १०% असत्य असते. त्रेता युगामध्ये ७०% सत्य आणि ३०% असत्य असते. द्वापार युगात ३०% सत्य आणि ७०% असत्य असते आणि कलियुगात १०% सत्य आणि ९०% असत्य असते. याचा अर्थ कुठल्याही युगात पूर्णपणे १००% सत्य किंवा पूर्णपणे १००% असत्य अशी स्थिती नसते.

how-much-to-give-to-charity-350x233.jpg

सत्य युगामध्ये १० वर्षे सतत अनुष्ठान, तपश्चर्या, सत्कर्म, अन्नदान इ. करुन जेवढे फळ मिळते, तेवढे फळ त्रेता युगात एक वर्ष तितकीच सत्कर्मे करुन मिळते. द्वापार युगात तेवढेच फळ मिळवायला एक महिना सतत अनुष्ठान आणि सत्कर्मे करावी लागतात आणि कलियुगात फक्त एक दिवस जर सत्कर्मे, साधना आणि अनुष्ठान केले तरी तेवढेच फळ मिळते. याचा अर्थ सत्य युगात जे फळ मिळायला १० वर्षे साधना करावी लागत असे, तेच फळ कलियुगात फक्त एक दिवस अन्नदान आणि सत्कर्मे करुन मिळते. खरतर हीच कलियुगाची अद्‍भुत उपलब्धी आहे.

जीवनात काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायच्या असतात. त्यावर फार चर्चा करता येत नाही किंवा त्या सिद्ध करून दाखवता येत नाहीत. ज्याची श्रद्धा आहे त्याने या संकल्पनांचा अनुभव घ्यायचा असतो. सत्पात्री अन्नदान ही अशीच एक उदात्त सामाजिक संकल्पना आहे. सत्पात्री अन्नदानाने आपल्या मनातील अनंत इच्छा, कल्पना पूर्ण होऊ शकतात. याचबरोबर आपल्या ऐहिक आणि पारलौकीक जीवनातील अडचणी आणि संकटे यांचे निवारण सत्पात्री अन्नदानाने होते. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियात जर कुणाला असाध्य रोगाने ग्रासले असेल, तर अन्नदानाने त्या रोगांपासून सुटका होवू शकते. अन्नदानाचे चमत्कार विलक्षण आहेत. त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे.

 

द्रौपदीची थाळी – सत्पात्री अन्नदान योजनेअंतर्गत जमा होणा-या रकमेतून समाजातील गरजू, उपेक्षित आणि पीडीत व्यक्तींना धान्य पुरविले जाते. ज्यांना गरज आहे अशा कुटुंबियांच्या / व्यक्तींचा शोध घेतला जातो. त्यांचेपर्यंत आत्मियतेने, प्रेमाने धान्य पोहोचवले जाते. प्रत्येक धान्याचा कण सत्पात्री आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाते. या देशात एक दिवस असा उगवेल की कोणीही उपाशी झोपणार नाही. द्रौपदीच्या अक्षय्य थाळीच्या रूपाने प्रत्येकाची किमान अन्नाची गरज भागली जाईल, असे आमचे स्वप्न आहे. सर्वांच्या सहकार्याने ते साकार होईल असा विश्वास वाटतो.

  

“ कर्दळीवन : एक अनुभूती ” या पुस्तकाचे लेखक श्री. क्षितिज पाटुकले यांनी रु. १,२१,०००/- ( रूपये एक लाख एकवीस हजार फक्त ) देवून द्रौपदीच्या थाळीचा शुभारंभ केला आहे. लवकरात लवकर दरमहा रू. १०००/- देणाऱ्या किमान १०,०००/- बांधवांनी द्रौपदीची थाळी – सत्पात्री अन्नदान योजनेत सहभागी व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे. श्रीदत्त संप्रदाय आणि श्रीस्वामी समर्थ संप्रदायामध्ये अन्नदान आणि अतिथी सेवा यांचे अपार महत्त्व आहे. श्रीदत्तप्रभूंच्या आणि श्रीस्वामींच्या आशिर्वादाने या द्रौपदीची थाळी – सत्पात्री अन्नदान योजनेचा विस्तार होवून देशातील सर्व गरजू व्यक्तींना तिचा आधार मिळेल, अशी खात्री आहे. आपण प्रत्येकाने यामध्ये सहभागीहून त्याला हातभार लावावा, अशी प्रत्येकाचे चरणी विनम्र प्रार्थना आहे.

Tags: Importance Of Food Donation, Donate Food Online, Food Donation, Corporate Social Responsibility

  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon
  • Twitter Social Icon
bottom of page